अनेक वर्षापासून ऐकिवात असलेला, वर्णन ऐकताच धडकी बसवणारा, आणि तेवढेच कुतूहल असलेला AMK सर करण्याचा योग जुळून आला. ट्रेकिंग चे सवंगडी पुण्याहून रात्री नऊ-दहाला निघाले, तोपर्यंत मी नाशिकहून टेक्निकल टीम बरोबर बेस विलेज (आंबेवाडी) ला पोचलो पण. भावली धरणाच्या जलाशयाच्या कडेने टू व्हीलर वरून रात्री गूढ रम्य वाटलं. सपाट विस्तीर्ण पसरलेलं राखाडी पाणी आणि मधेच चमकणारे दिव्यांचे प्रतिबिंब. वळणाच्या रस्त्याने तासभरात आंबेवाडी गावात पोचलो..
craft paper कापून मुलांनी डोंगरांची outline करावी तशी AMK ची लोभस silhouette आणि वर लक्ष तारे बघत हरखून गेलो. उद्या या डोंगररांगेत जायचे ही कल्पना सुखावणारी होती.. घरासमोर सारवलेल्या पटांगणात तंबू रोवले, विठ्ठल काकांबरोबर दिवाळीचा फराळ केला.. झोपणार तेवढ्यात पूर्वेकडून पठाराच्या अगदी क्षितिजावर कृष्ण पक्षातला षष्ठीचा oval आकाराचा लालसर चंद्र उगवताना पाहून वाटलं की मला खास निसर्गानेच अवतान धाडले आहे.
पहाटे झुंजूमुंजू ला पुण्याहून ' भटकंती' चे जिवलग सवंगडी पोहोचले.. चहा नाश्ता करून, harness घेऊन आम्ही अलंग-मदन च्या खिंड कडे निघालो. कापलेल्या भात शेतीतून, माळ रानातून वाटचाल करत सूर्योदयाला पायथ्याशी जंगलात पोचलो. परीकथेतल्या आकाराचे डोंगर आता अजून जवळ आले, आणि अवाढव्य दिसू लागले.. ओढा दगड धोंडे पार केल्यानंतर, घनदाट जंगलात वाट चढू लागलो. निबीड अरण्य ऊन जमिनीला पोहोचणे अवघड. सह्याद्रीचं इकडचं मनमोहक रूप न्याहाळत गड देवतेच्या शिल्पापाशी पोचलो. आरती केली. बरोबर एवढं अंतर पार केलं की अलंग किल्ला. midpoint.
अलंग-मदनच्या खिंड मध्ये बॅग्स ठेवून मदन किल्ला कडे जंगलातून जाणारा अलंग डोंगराच्या 90 डिग्री कडेचा मनमोहक traverse.. संपूच नये असा.
झाडं विरळ झाली आणि समोर मदन गडाचं दर्शन झालं.. नावाप्रमाणेच अतिशय सुंदर चित्तचोर रूप, गडावर उजव्या कडेच्या उभ्या कोरलेल्या पायऱ्या धडकी भरवणाऱ्या आणि दाद द्यायला लावणाऱ्या. मदन, what a masterpiece. सह्याद्रीच्या कातळात, सातवाहन काळात ही पायर्यांची वाट बनवणारे कारागीर, स्थापत्यकार हे soulful कलाकार असणार. खोल दरी उजवीकडे ठेवत, पायर्यांची वाट आणि traverse करत, rock patch climb करत मदन च्या summit वर सवंगड्यांसोबत तासभर विसावलो, गप्पा मारल्या. सर्प गरुड घिरट्या मारून अलंग च्या कपारीत शिरताना बघितला.. अलंग चंद्रकोरीप्रमाणे आकार स्कॉटिश highlands Quirrang ची आठवण करून देणारा.. मागे दिसणारा अजस्त्र कुलंग डोळे भरून न्याहळला.. कुलंग गडाचे नैसर्गिक solid फाउंडेशन, वर निमुळता होत जाणारा अजस्र विस्तार निव्वळ magnanimous.
मदन उतरतानाही शेवटचा पायऱ्यांचा patch अतिशय काळजीपूर्वक केला. थरार अनुभवत पुन्हा अलंग कडे प्रस्थान आणि गुहेत जाऊन डाळ खिचडी जेवण केले. काही क्षण विश्रांती घेऊन अलंग rock climbing सुरू केले.
आमच्याच climbers ची गर्दी वाढली .. अंधार पडायला लागला. आजचा सनसेट नक्कीच मिस होणार.. अलंगचा 70-80 फुटाचा rock patch दोर पकडून करायचा होता.. हे स्किल मी प्रथमच अवलंबत होतो.. 3 point climbing करत निम्म्याहून जास्त वर आलो, पण नंतर खाचा आणि सपोर्ट न सापडल्याने दोराला लटकून उभा राहिलो, हातात पुन्हा अवसान जमवून वर आलो एकदाचा.. शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा पुरेपूर घेणारा हा कडा. तिकडच्या गुहेत बसून धापा टाकल्या, श्वास नॉर्मल आणि हातात अवसान आल्यावर दोराला पकडून खतरनाक पायऱ्या head torch लावून वर चढलो.. घनघोर युद्धात जिंकलेल्या योध्या च्या अविर्भावात पठारावरून गुहेकडे निघालो.. felt good tired.. dehydrated but detoxed.. गुहेत गटागट पाणी प्यायलो आणि बाहेर येऊन पाठ टेकवली वर नक्षत्रे आणि आकाशगंगा बघत विसावलो.. तासभर आल्यावर जेवण आणि गुहेत tent मध्ये ओंडक्या सारखा झोपलो..
पहाटेलाच सगळे गड बघायला निघालो.. सूर्योदयापूर्वी ओमकार, सूर्यनमस्कार, पसायदान, शिवगर्जना म्हणून उगवत्या सूर्य नारायणाचे दर्शन घेतले.. रायबाच्या अभ्यासू आणि सखोल मार्गदर्शना खाली गडावरील वास्तु, सतीशिळा, जलव्यवस्थापन यांची माहिती घेतली..
सातवाहन काळापासून नाशिक-कल्याण या महत्त्वाच्या व्यापारी मार्गावरील हे किल्ले.. नगर आणि नाशिक जिल्ह्याला विभागणारे.. भौगोलिक, व्यापारी आणि राजकीयदृष्ट्या अतिशय मोलाचे.. हजारो वर्षांपूर्वी बांधलेली वास्तु, पाण्याची भव्य अशी 11 टाकी त्या काळातल्या advanced architecture ची साक्ष देतात. अलंग किल्ल्यावरून मदन चे पुन्हा दर्शन झाले तेही कोवळ्या सूर्यप्रकाशात.. सह्याद्री बरोबर झालेले हितगुज आणि कनेक्शन नाही विसरता येणार..
सकाळी बघितलं तेव्हा अलंग च्या ह्याच थरारक पायऱ्या आपण चाललो यावर विश्वास नाही बसला.. रॅपलिंग करून खाली आलो.. पुन्हा घनदाट जंगलातून न संपावी अशी पायपीट.. पुढचा स्टॉप हा कुलंग, त्याबद्दल नंतर लिहितो.. Point Break team चे जॉकी दादा, बनी, चेतन, दर्शन, अर्चनाताई यांनी आमच्यासाठी खूप मेहनत सेवाभावाने केली.. त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच
अजस्त्र कुलंग बघून उतरलो.. मदन चे या बाजूने दर्शन विलोभनीय आहे.. शंकराच्या जटा वर बांधलेल्या, कोरीव नेढे, तिसरा डोळा स्पष्टपणे संध्याकाळच्या उजेडात छाया प्रकाशात दिसत होता.. ध्यानमग्न भोळ्या शंभूच्या कृपेने इथले पक्षी, पशु, वृक्ष, निसर्ग अनंत काळ नांदावेत.. या भोळ्या च्या सहवासात मीदेखील प्रफुल्लित झालो..
Jai Shivraay
- अमोल सावंत (November 2020)


.jpg)






















Comments
Post a Comment